
Pune Crime: पुणे (Pune) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे.अनेक मेट्रोमोनी वेबसाईटवर आपला जोडीदार शोधतात, परंतु पुण्यात एका तरुणाला लग्नाचं आमिष दाखवून महिलेले लाख रुपयांचा चूना लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तरुणाला महिलेने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी तरुणाने पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही महिला उत्तर प्रदेशातील असल्याचे तरुणाने सांगितले. एका मेट्रोमोनी (Matrimonial Website) वेबसाईटवर भेट झाल्याचे तरुणाने सांगितले. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी आहे. खुशबू जैस्वाल असं महिलेचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी लग्नाचा प्रस्ताव ठेवाला असताना महिलेने समोरून होकार दिला. दोघे ही एकमेकांशी बोलू लागले. हळूहळू संवाद वाढू लागला. त्यानंतर महिलेने मुलासमोर कौटुंबिक समस्या आणि वैद्यकीय खर्चाचा उल्लेख केला आणि त्याच्याकडून 25 लाखांपेक्षा जास्त रुपये घेतले. अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली. (हेही वाचा- इंदौर येथे बेदम मारहाणी तरुणाचा मृत्यू, वडिलांना आणि भावाला अटक)
फसवणूकीची ही घटना तरुणाच्या लक्षात येता तरुणाने तातडीने वानवडी पोलिस ठाण्यात खुशबू जयस्वाल हीच्या विरोधात तक्रार दाखल केली. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ही घटना परिसरात समजताच, मोठी खळबळ उडाली आहे.