Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Indore Crime: कौटुंबिक वादामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दरम्यान इंदौर येथील खुडेल परिसरात पोटच्या मुलाची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या  प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी मुलाला मारहाण केली गंभीर दुखापतीत त्याच्या मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.आरोपींनी मृत्यूचे खरे कारण लपवण्याचा प्रयत्न केला त्याऐवजी त्याचा अपघातात दुखापत झाल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला होता परंतु शवविच्छेदनात त्याला अंतर्गत 22 जखमा झाल्याचे अहवाल समोर आले. गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, चमन सिंग जाटव 28 असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे, १६ डिसेंबर रोजी  त्याचे वडिल रमेश जाटव आणि भाऊ विनय यांनी चमन बेशुद्द अवस्थेत टिळक नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रुग्णालायत नेलं होते. जखमी अवस्थेत त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. परंतु दुसऱ्या दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली कारण त्याचा संशयांस्पद मृत्यू झाल्याचे डॉक्टरांना समजले. पोलिसांनी या प्रकरणी वडिल आणि मुलाची चौकशी केली तेव्हा चमनचा अपघात झाल्याचे खोटा दावा केला. त्यानंतर चमनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर अहवालात २२ अंतर्गत जखमा झाल्याचे समोर आले.

पोलिसांनी वडिल आणि मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली तर त्याला मारहाण केल्याचे समोर आले.मारहाणीत चमनला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी खुडेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. भारतीय दंंड कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले.