Court Hammer | (Photo Credits-File Photo)

कोरोना विषाणूने (Coronavirus) महाराष्ट्रात (Maharashtra) थैमान घातले आहे, उपयोजना म्हणून लॉक डाऊन (Lockdown) चालू आहे. या लॉक डाऊनचे कडक पालन व्हावे म्हणून प्रशासन झटत आहे. अशात डीएचएफएल (DHFL) गटाचे सदस्य लॉक डाऊनचे उल्लंघन करून महाबळेश्वरला (Mahabaleshwar) गेल्याने एकच गदारोळ उठला होता. आता सातारा कोर्टाने आज डीएचएफएल समूहाचे कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबातील (Wadhawan Family) 22 इतर सदस्यांना महाबळेश्वर येथील त्यांच्या फार्महाऊसवर होम क्वारंटाईनसाठी पाठवले आहे. कुटूंबाचा क्वारंटाईन कालावधी काल पूर्ण झाला होता, मात्र कोर्टाने त्यांना 3 मे पर्यंत सातारा न सोडण्याचा आदेश दिला आहे.

एएनआय ट्विट -

लॉक डाऊन चालू असताना, 10 एप्रिल रोजी वाधवान कुटुंबातील 23 जण मुंबईहून महाबळेश्वरला गेले व यासाठी त्यांना विशेष परवानगी देण्यात आली असल्याची बाबा उघड झाली होती. त्यानंतर याबाबत विरोधी पक्षाने टीकास्त्रे सोडायला सुरुवात केल्यावर महाराष्ट्र सरकारने याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले होते. महाराष्ट्राचे मुख्य सचिव अमिताभ गुप्ता यांच्या परवानगीने वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे समोर आले होते, त्यानंतर गुप्ता यांना निलंबित करण्यात आले. (हेही वाचा: लॉक डाऊनमध्ये येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबामधील 23 सदस्य महाबळेश्वरला; गृहमंत्रालयाच्या सचिवांनी दिले परवानगीचे पत्र)

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी सकाळी फेसबुक लाइव्ह दरम्यान या बाबत माहिती दिली होती. ते म्हणाले होते 'वाधवन कुटुंबाच्या विलगी करणाचा कालावधी संपला आहे, सीबीआय आणि ईडीने आमच्याकडे त्यांना ताब्यात घ्यायची मागणी केली आहे. या गोष्टीसाठी आम्ही परवानगी दिली आहे.' मात्र आज सातारा कोर्टाने या कुटुंबाला 3 मे पर्यंत महाबळेश्वर येथेच राहण्याचे निर्देश दिले आहेत.