Shirur Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण अजून ही शांत झालेलं नाही तेवढ्यात शिरूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे. पोलिस पाटलांच्या अल्पवयीन मुलीने दोन तरुणांना जीपखाली चिरडले आहे. या घटनेत एकाने जागीच प्राण सोडले आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई Shivani Agarwal हीला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने भरधाव जीव दोन तरुणांच्या अंगावर घातली आहे. या घटनेत अरुण मेमाणे याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर महिंद्र बांडे जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे मुलगी जेव्हा जीप चालवत होती त्यावेळीस तिचे वडिल (पोलिस पाटील) ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसले होते. या घटनेनंतर शिरूर तालुक्यात पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून घेतला आहे.
शिरूर तालुक्यातील अरगावचे पोलिस पाटील संतोष लेंडे यांनी मालवाहू पिकअप शेतात घेऊन जात होते. त्यावेळी अर्ध्या रस्त्यावरून वाहन मुलीला चालवण्यासाठी दिले. पिकअपवरून नियत्रंण सुटल्याने गाडी वेगवान झाली. दुचाकीवरून दोन जणा रस्त्याच्या समोरून येत होते. त्यावेळीस पिकअप थेट दुचाकीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांना ५० फुट लांब फरफटतं नेले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती गावात मिळतात, गावकऱ्यांनी अपघातस्थळी गर्दी केली. जखमीला तात्काळ रुग्णलयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर गावातून पोलिस पाटलांवर संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून संतोष लेंडे यांच्याविरुध्दात गुन्हा दाखल केला. राज्यभरात