Pune Porsche Car Crash: पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिला अटक करण्यात आले आहे. पुणे पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयात अल्कोहोल चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीचा रक्ताचा नमुना एका महिलेच्या नमुन्यात बदलण्यात आल्याचे आढळून आले होते. अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. नमुने बदलण्यासाठी त्यांनी डॉक्टरांना पैसे देखील दिले होती. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली. गेल्या काही दिवसांपासून शिवानी अग्रवाल बेपता होत्या. पुणे पोलिस गुन्हे शाखेकडून शिवानी अग्रवाल यांना अटक करण्यात आले आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. (हेही वाचा- अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने आई Shivani Agarwal चे? शिवानी अग्रवाल सध्या बेपत्ता असल्याने चर्चांना उधाण)
Pune car accident case | Mother of the minor accused arrested in the case: Pune Police Commissioner Amitesh Kumar
(File photo)#Maharashtra pic.twitter.com/9U64dsGGxv
— ANI (@ANI) June 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)