Pune Porsche Car Accident: अल्पवयीन आरोपीचे बदललेले रक्ताचे नमुने आई Shivani Agarwal चे? शिवानी अग्रवाल सध्या बेपत्ता असल्याने चर्चांना उधाण
Missing (PC - File Image)

पुणे कल्याणी नगर मध्ये पोर्शे कार अपघातामध्ये (Pune Porsche Car Accident) अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडल्यानंतर हे प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात त्याच्या कुटुंबियांनी केलेले अनेक गैर प्रकार आता समोर येत आहेत. सध्या आरोपी मुलगा बालसुधारगृहात तर वडील आणि आजोबा पोलिसांच्या अटकेत आहे. दारूच्या नशेत गाडी चालवल्याने त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते पण प्रकरण दाबण्यासाठी त्याच्या कुटुंबाकडून ते फेकून दुसर्‍या रक्ताचे नमुने वापरून रिपोर्ट्स बनवल्याचा दावा समोर आला आहे. यामध्ये ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाचे बदललेले ब्लड सॅम्पल हे एका महिलेचे असल्याचं चौकशी समितीच्या अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता हे रक्त आरोपीची आई शिवानी अग्रवाल (Shivani Agarwal) यांचं असल्याची चर्चा आहे. अद्याप यावर कोणीही पुष्टी केलेली नाही.

मीडीया रिपोर्ट्सनुसार आरोपी मुलाची आई सध्या बेपत्ता आहे. शिवानी अग्रवाल यांची देखील पोलिसांकडून चौकशी होणार आहे. पण त्या बेपत्ता आहेत. ड्रायव्हरला धमकावल्या प्रकरणी देखील त्यांची चौकशी होणार आहे. मात्र पोलिस ताब्यात घेतील या भीतीने सध्या त्या बेपत्ता आहेत. त्यांचा फोनही बंद असल्याचं समोर आलं आहे. नक्की वाचा:  Pune Porsche Car Accident Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड प्रकरणी अजून एक पोलिसांच्या ताब्यात .

सध्या पुण्याच्या ससून हॉस्पिटल मधील अटकेत असलेले डॉक्टर अजय तावरे हे Forensic Medicine And Toxicology विभागाचे प्रमुख आहेत. तर डॉक्टर श्रीहरी हरलोल हे अपघात विभागात चीफ मेडिकल ऑफिसर आहेत. या दोघांसोबतच हॉस्पिटलच्या डीनला देखील सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी 3 लाखांचा व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने आणखी एका लॅबमध्ये पाठवून DNA टेस्ट करायचं ठरवलं आणि डॉक्टरांचं बिंग फुटले आहे.

शिवानी अग्रवाल काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयात आक्षेपार्ह शब्दामधील रॅप सॉंग़ आरोपी मुलाचं असल्याचा व्हीडिओ वायरल झाला होता तेव्हा शिवानी अग्रवाल यांनी एक व्हिडिओ जारी करत हा आपल्या मुलाचा व्हिडिओ नसून पोलिसांनी त्याचं संरक्षण करावं असं रडत आवाहन केले होते.