पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात छेडछाड प्रकरणी अजून एक पोलिसांच्या ताब्यात आला आहे. आज सकाळी ससून हॉस्पिटल मधील 2 मोठ्या डॉक्टरांना बेड्या घातल्यानंतर आता या प्रकारातील ही तिसरी अटक आहे. दरम्यान दारूच्या नशेत अल्पवयीन मुलगा गाडी चालवत असल्याचं समोर आलं होतं मात्र त्यासाठीचा पुरावा रक्ताच्या नमुन्यांमधून मिळणार होता. हा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीच्या कुटुंबाकडून डॉक्टरांना सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Pune Porsche Accident Case: अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकले, दुसऱ्याचेच नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले; पुणे पोलिस आयुक्तांची माहिती .
Pune car accident case: Pune Police arrested one more accused in the case for his alleged involvement in the manipulation of the blood sample of the minor accused: Pune Police officials
— ANI (@ANI) May 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)