Tomato Price Hike: सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोची (Tomato) लागवड करून लाखो रुपये कमावले आहेत. तुकाराम भागोजी गायकर आणि त्यांच्या कुटुंबाने एका महिन्यात 13,000 टोमॅटो क्रेट विकून 1.5 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तुकाराम यांच्याकडे 18 एकर शेतजमीन असून 12 एकर जमिनीवर त्यांनी त्यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली यांच्या मदतीने टोमॅटोची लागवड केली आहे. गायकर कुटुंबाने सांगितले की, ते चांगल्या दर्जाचे टोमॅटो पिकवतात. टोमॅटो शेतीचं त्यांना ज्ञान आहे.
नारायणगंजमध्ये टोमॅटोचा एक क्रेट विकून शेतकऱ्याने एका दिवसात 2,100 रुपये कमवले. गायकर यांनी शुक्रवारी एकूण 900 क्रेट विकून एकाच दिवसात 18 लाख रुपयांची कमाई केली. गेल्या महिन्यात, त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर टोमॅटोचे क्रेट 1,000 ते 2,400 रुपये प्रति क्रेट दराने विकले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात टोमॅटो पिकवणारे अनेक शेतकरी आता करोडपती झाले आहेत. (हेही वाचा - Tomato Price Hike: सुनील शेट्टीच्या प्रतिक्रियावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची बोचरी टीका)
दरम्यान, समितीने टोमॅटो विकून एका महिन्यात 80 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून यातून परिसरातील 100 हून अधिक महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. तुकाराम यांची सून सोनाली लागवड, कापणी, पॅकेजिंग यासारखी कामे सांभाळते. तर त्यांचा मुलगा ईश्वर विक्री, व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजन सांभाळतो. बाजारातील अनुकूल परिस्थिती अनुभवल्याने गेल्या तीन महिन्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.
नारायणगंज येथील झुनू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात, चांगल्या दर्जाच्या (20 किलोग्रॅम) टोमॅटोची सर्वाधिक किंमत 2,500 रुपये होती, जी 125 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. टोमॅटो विकून करोडपती होणारे शेतकरी हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही. कर्नाटकातील कोलार येथील शेतकरी कुटुंबाने या आठवड्यात टोमॅटोच्या 2,000 पेटी विकल्या आणि यातून त्यांनी 38 लाख रुपये कमावले.