Tomato Price Hike: सुनील शेट्टीच्या प्रतिक्रियावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची बोचरी टीका
सुनील शेट्टी सद्या चर्चेत आहे. टोमॅटो आम्हाला परवड नाही, अशी प्रतिक्रिया माध्यामांसमोर सुनील शेट्टी यांनी दिली आहे. त्यावर शेतकरी वर्ग चांगलाच संतापलेला आहे.
Tomato Price Hike: टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम किचन वरही होत आहे. अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टीने (Sunil Shetty) दिली आहे. या व्यक्तावरून शेतकरी वर्गाने संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर देखील सुनील शेट्टीवर नेटकऱ्यांनी झापले आहे. याचदरम्यान शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनीही सुनील शेट्टीवर टीका केली. याचसोबत शेतकरी नेते रविकांत तुपकर(Ravikant Tupkar/) यांनीही तडफदार टीका केली आहे. टोमॅटो खाल्ला नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही, अशी बोचरी टीका रविकांत तुपकर यांनी केली आहे.
सुनील शेट्टीने टोमॅटोचे भाव वाढल्याने त्यांच्या पत्नी स्वयंपाक घरात टोमॅटोचा वापर कमी करत आहे, असं म्हटलं आहे. जर भाव वाढले असतील तर सुनील शेट्टीने टोमॅटो खाऊ नये, शेट्टी काही मरणार नाही, मात्र शेतकऱ्यांची टिंगल टवाळी करू नये, अशा शब्दात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अभिनेता सुनील शेट्टीला शाब्दिक फटकारले आहे.अस मीडियाशी संवाद साधताना बोलत होते.
सुनिल शेट्टी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी वाढत्या टोमॅटोच्या भावामुळे एक व्यक्तव्य दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्ग चांगलाच तापलेला आहे. पाऊस लाबंणी गेल्यामुळे टोमॅटोच्या किंमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच्या वतीने रविकांत तुपकर यांनी सुनील शेट्टीवर टीका केली आहे. टोमॅटोची किंमत आणखी वाढणार असल्याची शक्यता दर्शवली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2023 12:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

