Beed: भाजप नेत्याच्या कारखान्यातून चोरी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी नगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस (Photo Credits-Facebook)

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे वर्चस्व असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यातून (Vaidyanath Sugar Factory) जवळपास 38 लाखांची चोरी झाल्याची माहिती समोर आली होती. परळी (Parli) ग्रामीण पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आता या चोरीच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या चोरीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) महिला नगरसेविकाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अजीज इस्माईल शेख उर्फ मंगलदादा असे आरोपीचे नाव असून ते सध्या फरार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या मुलगा तब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोअर गोडाऊन आणि एक वर्कशॉप गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये 17 ऑक्टोबर 2020 ला चोरी झाली. चोरट्यांनी कारखान्याच्या स्टोअर गोडाऊन आणि वर्कशॉपमधून तब्बल 37 लाख 84 हजारांचे साहित्य लंपास केल्याचे तक्रार परळी ग्रामीण पोलिसांकडे 22 डिसेंबर रोजी देण्यात आली होती. त्यात कारखान्याचे संगणक, कपर मटेरियल, मिल बेअरिंग, बुश साऊंड बार अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. यासंदर्भात टीव्ही9 ने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा- MNS on Amazon: फिल्पकार्ट ने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार; राज ठाकरे यांना न्यायालयाची नोटीस आल्यावर मनसे नेते अखिल चित्रे यांचा इशारा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पंकजा मुंडे राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकल्या गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. कोरोना संकटात त्या मुंबईतच असल्यामुळे त्यांना फोनच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील काम करावी लागल होती. त्यानंतर अखेर पंकजा मुंडे यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.