महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध अॅमेझॉन (MNS) असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. मनेसेने अॅमेझॉन (Amazon) कंपनीने मराठी भाषा (Marathi Language) वापरावी यासाठी मोहिम सुरु केली आहे. त्याविरुद्ध अॅमेझॉनने मनसे विरोधात दिंडोशी कोर्टात धाव घेतली आहे. दिंडोशी कोर्टाने राज ठाकरे (Raj Thackeray) यांनाही नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता अॅमेझॉन विरुद्ध मनसे असा सामना पाहायला मिळू शकतो. दुसऱ्या बाजूला मनसे नेते अखिल चित्रे यांनी फिल्पकार्ट ने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार, असे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिंडोशी न्यायालयाने नोटीस बजावून राज ठाकरे आणि मनसे सचिव यांना 5 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाच्या नोटीसनंतर मनसेने अॅमेझॉनविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. (हेही वाचा, Amazon Responds To MNS: मनसे ठाम! अॅमेझॉन कंपनी संस्थापक जेफ बेजॉस यांनीही घेतली दखल)
अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन दोन ट्विट केली आहेत. त्यापैकी एकात फ्लिपार्टने मराठी भाषा ऑप्शन सुरु केल्याचा आणि मराठी भाषेत फ्लिपकार्टवर माहिती उपलब्ध असल्याचा स्क्रिन शॉट आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये अखिल चित्रे अॅमेझॉनला इशारा देताना दिसत आहेत की, सत्यता जाणून घ्या आणि अॅमेझॉनमध्ये मराठी भाषेचा वापर सुरु करा. अन्यथा लवकरच आपल्याला धडा शिकविण्यात येईल. (हेही वाचा, Amazon, Flipkart App मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मागणी नाहीतर दिवाळीचा सण MNS स्टाइलने साजरा केला जाण्याचा इशारा)
अखिल चित्रे यांनी म्हटले आहे की, आजही मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. ते महाराष्ट्रात व्यवसाय करत आहेत हे त्यांनी विसरु नये. अन्यथा आम्ही त्यांना सह्याद्रीचे पाणी पाजू.