Rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Thane Shocker: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भिंवडीत एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तीची हत्या करण्यात आली आहे, या  प्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही घटना भिंवडी परिसरातील शांती नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. गोंविद नगर येथील रहिवासी असलेला अभय यादव (42) याने मुलीवर बलात्कार करून हत्या केली. (हेही वाचा- पालघरमध्ये घरे देण्याच्या नावाखाली १.१५ कोटींची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीला अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिकांना रस्त्यावर एका मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गुरुवारी त्याने मुलीचे अपहरण केले होते. अपहरण करून मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर मुलीचा गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्यानंतर मुलीचा मृतदेह रस्त्यावर टाकून दिला. पोलिसांनी घटनेची नोंद घेत आरोपीला काही तासांतच अटक केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शांतीनगर परिसरात आणखी एक घटना घडली आहे. पत्नीची हत्या करून आरोपीने मृतदेह विहरीत फेकला. भावधड गावातील कांचन दास या महिलेची तिच्या पतीने हत्या केली. बुधवारी आरोपीने महिलेचा स्कार्फने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेह विहरीत फेकला. कांचनच्या घरच्यांना ती पळून गेल्याचे खोटे कारण सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करत आरोपीला अटक केले. दोन्ही प्रकरणात भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.