Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Chhatrapati Sambhajinagar News:  छत्रपती संभाजीनगर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालया आणि रुग्णालयातील व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्पिटलच्या बिघडलेल्या लिफ्टमघ्ये अर्धा तास अडकून राहिल्याने गुदमरून एका वृध्द रुग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली आहे. (हेही वाचा- हार्लेनच्या आगीत 27 वर्षीय भारतीय नागरिकाचा मृत्यू, दूतावासाकडून मदतीचा हात)

मिळालेल्या माहितीनुसार,किशोर गायकवाड ६२ असं लिफ्टमध्ये अडकून मृत झालेल्याचे नाव आहे. किशोर हे पत्नीसह शहरात राहायचे. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्याने शुक्रवारी जीएमसीएचच्या रुग्णालायत दाखल केले. उपचारासाठी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर जेरियाट्रिक विभागात दाखल केले होते.ओपीडिमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना तळमजल्यावर हलवण्याचा निर्णय घेतला होता.

डॉक्टरांसह गायकवाड यांना लिफ्टमधून नेण्यात आले होते. मात्र, लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने आत ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली. डॉक्टरांनी सीपीआरच्या मदतीने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. पंरतु उशीर झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. ही लिफ्ट २५ वर्ष जूनी आहे.  GMCH प्रशासनाला अंदाजे ₹ 23 लाख खर्चून नवीन स्थापित करण्याचा प्रस्ताव देण्यास प्रवृत्त केले आहे. जुनी लिफ्ट बदलण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे डीन डॉ.शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.