Boy Killed As Car Hits At Nashik (फोटो सौजन्य - X/@imvivekgupta)

Boy Killed As Car Hits At Nashik: बुधवारी नाशिक (Nashik) शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या पार्किंग क्षेत्रात एका चार वर्षांच्या मुलाचा कारने चिरडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये घडली. हा मुलगा त्याच्या वडिलांसोबत गेला होता. मृत मुलाचे वडिल हे व्यवसायाने चालक असून ते ग्राहकांना त्याच्या गाडीतून हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचं काम करतात. हॉटेलमध्ये आल्यानंतर, त्यांचा मुलगा त्याच्या वडिलांच्या गाडीतून उतरला आणि पार्किंग क्षेत्रात खेळू लागला.

मृत मुलाचे वडील गाडी पार्क करण्यासाठी गेले असताना, पार्किंग क्षेत्रास आलेल्या दुसरा एका कारचालकाने मुलाला चिरडलं. घटनेनंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेत मुलाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या वडिलांनी आणि हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी मुलाला रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा - Narayangaon Accident: पुण्यातील नारायणगावजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये 9 प्रवाशांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य जाहीर)

अपघात स्थळावरील दृश्य -

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, एक कार हॉटेलच्या परिसरात प्रवेश करताना दिसत आहे, तर अचानक एक मुलगा गाडीसमोरून धावतो. गाडी मुलाला धडकते आणि त्याला चिरडून पुढे जाते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगा गाडीखाली चिरडल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: Accident On Chakan-Shikrapur Highway: चाकण-शिक्रापूर महामार्गावर मद्यधुंद चालकाने 25 ते 30 वाहनांना कंटेनरने चिरडले, 4 जणांचा मृत्यू)

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची चौकशी सुरू केली. पोलिसांनी या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आहे. तसेच पोलिस आरोपी कारचालकाचा शोध घेत आहेत.