पुणे जिल्ह्यात, नाशिक-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून, त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. इथल्या नारायणगाव परिसरात शुक्रवारी सकाळी साधारण 10 वाजता झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. पुणे ग्रामीण पोलिसांचे एसपी पंकज देशमुख यांनी शेअर केलेल्या अधिक माहितीनुसार, टेम्पोने एका गाडीला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अहवालानुसार, एक मिनीव्हॅन नारायणगावकडे जात असताना पाठीमागून एका टेम्पोने वाहनाला धडक दिली व त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिकाम्या बसवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये मिनीव्हॅनमधील सर्व नऊ प्रवासी ठार झाले.

या भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुणे प्रशासनाने दिली. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे त्यांनी पुणे पोलीस अधीक्षक यांना सांगितले आहे. (हेही वाचा: Accident On Chakan-Shikrapur Highway: चाकण-शिक्रापूर महामार्गावर मद्यधुंद चालकाने 25 ते 30 वाहनांना कंटेनरने चिरडले, 4 जणांचा मृत्यू)

नारायणगावजवळ भीषण अपघात-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)