प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

हैदराबाद, उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरण पेटलेले असताना बलात्काराच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यातच 20 वर्षीय नर्स तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना गडचिरोली ( Gadchiroli) येथे रविवारी घडली. त्यानंतर पीडिताने स्थानिक पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला आज अटक केली असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणी संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. यामुळे नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. हैदराबाद बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काउंटरनंतर देशात आनंद साजरा करण्यात आला होता. एन्काउंटरनंतर कोणताही व्यक्ती बलात्काराचे धाडस करणार नाही, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, त्यानंतर बलात्काराच्या अधिक घटना घडू लागल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, उन्नाव बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. हे देखील वाचा-चेंबूर: पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने 2 चिमुकल्यांची हत्या करुन पतीने स्वत:चेही जीवन संपवले

एएनआयचे ट्वीट-