Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 9 हजार 615 नवे कोरोना रुग्ण; तर 278 जणांचा मृत्यू
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. आज राज्यात 9 हजार 615 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 278 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय आज 5 हजार 714 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 117 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 1 लाख 99 हजार 967 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. तसेच आतापर्यंत 13 हजार 132 जणांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशस्वी ठरली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालया (Public Health Department) ने माहिती दिली आहे. (हेही वाचा - कोरोना रुग्णांचा मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, आज मुंबई शहरात 1 हजार 62 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मुंबईत 24 तासात 1158 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत शहरात 78 हजार 260 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर 73 टक्के आहे. सध्या मुंबईत 22 हजार 647 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.