Rape | File Image

Mumbai Shocker: गोरेगावच्या दिंडोशी परिसरात (Goregaon Dindoshi Area) 75 वर्षीय महिलेवर बलात्कार (Rape) करणाऱ्या 20 वर्षीय पुरूषाला पोलिसांनी अटक (Arrest) करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिताच्या कलम 64(1) आणि 332(B) अंतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.12 जानेवारी रोजी अटक केल्यानंतर, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. पीडित महिलेवर बलात्काराची घटना 8 जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला एका छोट्या घरात एकटी राहत होती. जवळच राहणारी तिची मुलगी आणि बहीण अधूनमधून तिला भेटायला येत असतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज वापरून त्यांना आरोपीचा शोध घेण्यात यश आले. तिच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबातील सदस्यांनी घरात सीसीटीव्ही बसवले होते. कुटुंबातील सदस्यांच्या मते, वृद्ध महिलेला स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे. 8 जानेवारी रोजी दुपारी एका अज्ञात तरुणाने पीडितेच्या घरात प्रवेश केला. यावेळी आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. (हेही वाचा -Mankhurd Rape Case: मानखुर्द मध्ये 17 वर्षीय मुलाने चाकूचा धाक दाखवत महिलेवर केला बलात्कार)

सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आली घटना -

दरम्यान, 12 जानेवारी रोजी महिलेची मुलगी तिला भेटायला आली. त्यावेळी तिने सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा ही घटना उघडकीस आली. एका तरुणाने तिच्या आईवर लैंगिक अत्याचार केल्याचे पाहून घाबरलेल्या मुलीने ताबडतोब पोलिसांकडे धाव घेतली आणि पुरावा म्हणून फुटेज सादर केले. (हेही वाचा -Palghar Rape Case: पालघर हादरलं, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक)

आरोपीवर गुन्हा दाखल -

पीडितेच्या मुलीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी दोन तासांत आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपीने सांगितले की तो काही काळापासून वृद्ध महिलेवर लक्ष ठेवून होता. घटनेच्या दिवशी, तो तिच्या घरात घुसला आणि त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला.