Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईच्या मालाड (Malad)  परिसरातील 72  वर्षीय ओमप्रकाश शुक्ला यांचा कोणत्याही रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने मृत्यू झाल्याचे समजत आहे. ओमप्रकाश यांना श्वसनात त्रास असल्याने  त्यांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली होती, मात्र ही चाचणी निगेटिव्ह होती. 7 एप्रिलला त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने मालाड येथील थुंगा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होऊ शकणार नसल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले गेले त्यानुसार 8 एप्रिल रोजी संध्याकाळी ओमप्रकाश यांचा मुलगा, जावई आणि पत्नी तिघांनी त्यांना दुसऱ्या रुग्णलायत दाखल करून घेण्यासाठी विचारणा केली, पण बहुतांश रुग्णालयांनी कोरोनाच्या धास्तीमुळे तर काहींनी हे रुग्णालय केवळ कोरोना रुग्णानासाठी राखीव आहे असे सांगत त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला परिणामी उपचारांच्या विना त्यांचा मृत्यू झाला. या प्रसंगानंतर कोरोनाच्या धास्तीमुळे हॉस्पिटलचे अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होतंय का असा सवाल उपस्थित झाला आहे. Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या 210 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर

ओमप्रकाश शुक्ला यांचे जावई जगदीश मिश्रा यांनी लोकसत्ताला दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश खासगी आणि सरकारी रुग्णालयांनी करोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे कारण देत उपचार करण्यास नकार दिला. तर काहींनी ICU मध्ये जागा नसल्याचे कारण दिले. एका नामंकित रुग्णालयाने तर शुक्ला यांना कोरोना असल्याच्या संशयानी दाखल करून घेण्यास नकार दिला. कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवा तरच उपचार करू अशी आत सुद्धा येथील डॉक्टरांनी घातली. काहीच पर्याय नसल्याने त्यांना शताब्दी रुग्णलयात दाखल करून नेण्यासाठी शुक्ला कुटुंबाने प्रयत्न केला पण हे रुग्णालय सध्या केवळ कोरोनाग्रस्तांसाठी राखीव आहे असे म्ह्णून तिथेही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला.

दरम्यान, शुक्ला कुटुंबाने हताश होऊन ओमप्रकाश यांना आपल्याच घरी नेले आणि ऑक्सिजन सिलेंडर लावला मात्र तोपर्यंत त्यांनी जीव सोडला होता. वेळीच उपचार मिळाले असते त्यांचा मृत्यू ओढावला नसता, असा आरोप जगदीश मिश्रा यांनी केला. या संदर्भात रुग्णालयांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.