Coronavirus Cases In Mumbai: मुंबईमध्ये आज 709 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 56 जणांचा मृत्यू
Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus Cases In Mumbai: मुंबईमधून (Mumbai) आज एक दिलासादायक बातमी हाती आहे. मुंबईमध्ये आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईमध्ये आज 709 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 56 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 873 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 18 हजार 130 इतकी झाली आहे. शहरात आतापर्यंत 90 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या मुंबईत 20 हजार 326 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुर्देवाची बाब म्हणजे आतापर्यंत 6 हजार 546 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Coronavirus: राज्यात कोरोना व्हायरस संक्रमनावर उपचार घेणऱ्या 12,326 जणांना आज डिस्चार्ज, 300 जणांचा मृत्यू)

दरम्यान, आज दिवसभरात राज्यात 7 हजार 760 नव्या कोरोनांची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज 12,326 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.