Coronavirus in India | representational Image | (Photo Credits: IANS)

देशात नव्या 1324 रुग्णांसह कोरोना विषाणू (Coronavirus) बाधितांची संख्या 16 हजाराच्यावर पोहचली आहे. यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सर्वात जास्त संक्रमित प्रकरणे आहेत. आज महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज 552 नवीन कोरोना व्हायरस केसेस आणि 12 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह एकूण सकारात्मक घटनांची संख्या 4200 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 223 मृत्यूची नोंद झाली असून, 507 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

एएनआय ट्विट -

महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील धारावी येथे आणखी 20 जणांना कोरोनाची लागण झाली असून, येथील एकूण रुग्णांची संख्या 138 वर पोहचली आहे. तसेच 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. मुंबईत आज कोरोनाचे नवे 135 रुग्ण आढळून आले तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे मुंबईत एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2798 वर पोहचला असून, 131 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये 310 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. (हेही वाचा: मुंबई: धारावीत आणखी 20 नवे कोरोनाबाधीत आढळले; आतापर्यंत 138 लोकांना संसर्ग तर, 11 जणांचा मृत्यू)

रविवारी भारतात परदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराची लागण झालेल्या लोकांची, संख्या 16,116 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे 519 लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि सध्या एकूण 13,295 लोक या साथीच्या आजाराशी झुंजत आहेत. त्याचबरोबर, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूची 1324 नवीन प्रकरणे नोंदविली गेली आहेत, तर 31 लोकांचा मृत्यू झाला आहे.