Maharashtra ZP Election 2021: राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर
District Council Elections 2019 | Elections (Photo Credits: PTI)

Maharashtra ZP Election 2021: कोरोनाची तिसरी लाट आणि डेल्टा प्लस वेरिएंटचा धोका पाहता राज्यातील 5 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या 33 पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, सर्वोच न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला फटाकारत या निवडणुकांची तारीख 48 तासाच्या आत जाहीर करण्याचे निर्देश दिले. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानंतर लगेच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाची तारीख जाहीर केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारीखानुसार, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर, 6 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हे देखील वाचा- Kirit Somaiya यांनी केला 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; मंत्री Hasan Mushrif करणार 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

ट्वीट-

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य शासनाच्या विनंतीनंतर राज्य निवडणूक आयोगाने 9 जुलै रोजी या निवडणुका स्थिगित करण्याचा निर्णय घेतला होता.