Kirit Somaiya यांनी केला 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; मंत्री Hasan Mushrif करणार 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याचे पूर्ण पुरावे आयकर विभागाला दिले आहेत
महाराष्ट्रातील ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, मी हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोटाळ्याचे पूर्ण पुरावे आयकर विभागाला दिले आहेत. जे सुमारे 2700 पानांचे आहे. यावर मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली, ते म्हणाले की, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप पूर्पपणे खोटे आहेत. मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही. ते पुढे म्हणाले की, येत्या दोन आठवड्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात मी फौजदारी 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे.
किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सोमय्या म्हणाले की, मुश्रीफ यांची पत्नी साहिरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने संताजी घोरपडे शुगर मिलमध्ये 3 लाख 78 हजार शेअर्स दाखवण्यात आले आहेत. मुश्रीफ यांच्यावर सीआरएम सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या शेल कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी हसन मुश्रीफ कुटुंबावर आयकर छापे टाकण्यात आले होते.
पत्रकार परिषदेमध्ये मुश्रीफ म्हणाले की, ‘सोमय्या यांनी केलेल्या आरोपाबाबत मी त्यांचा तीव्र निषेध करतो. सोमय्या यांनी दाखवलेली सर्व कागदपत्रे ही आरओसी साईटवर आधीपासूनच उपलब्ध आहेत. ती आम्ही अपलोड केली आहेत. जर ती खोटी असती तर आम्ही ही गोष्ट लपवू शकलो असतो. शिवाय निवडणुकीची प्रतिज्ञापत्रे देखील नेटवर उपलब्ध असतात. त्यामुळे सोमय्या यांनी कागदपत्रे गोळाकरून करून नवीन केलेले आरोप अतिशय बिनबुडाचे आहेत.’ (हेही वाचा: 'हवेत गोळीबार करू नका' चंद्रकांत पाटील यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया)
यापूर्वी किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर बेकायदा बांधकाम आणि जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. याशिवाय भावना गवळी, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2021 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

