पालघर जिल्ह्यात धबधब्यात अंघोळीसाठी गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मुंबईहून जवळजवळ 150 किमी दूर असलेल्या पालघर जिल्ह्यतील जव्हार मधील अंबिक चौकाच्या येथे राहणारे 13 जण गुरुवारी कालमांडवी धबधब्याजवळ अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी पावसाच्या पाण्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचा त्यांना अंदाज न आल्याने अंघोळ करण्याच्या नादात खोल पाण्यात गेल्याचे समजले नाही. यामधील 5 जणांना पोहता न आल्याने ते धबधब्यत बुडाल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

घटनेस्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून या सर्वांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी 5 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलीस अधिक्षका कार्यालय प्रवक्ता सचिन नावडकर यांनी असे म्हटले आहे की, 13 जण हे धबधब्याजवळ फिरण्यासाठी गेले होते. तेथे 5 जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.(Mumbai Rain Update: दादर मधील हिंदमाता भागात मुसळधार पावसामुळे वॉटर लॉगिंग, Watch Video) 

Mumbai Monsoon 2020: मुंबईत मुसळधार पाऊस; हिंदमातासह सखल भागात पाणी साचले, पाहा व्हिडिओ - Watch Video 

धबधब्यात अंघोळीसाठी गेलेल्या एका व्यक्तीने असे म्हटले की, पावसाच्या पाण्यामुळे येथे धबधबा निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणी नागरिक पिकनिकसाठी येतात. सर्व तरुण धबधब्याच्या किनाऱ्याजवळ अंघोळ करत होते. मात्र काही जण अगदीच खोल पाण्यात गेल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळेच ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे एसपी दत्तात्रेय शिंदे, जिल्हाधिकारी कैलाश शिंदे आणि अन्य अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती घेतली. लॉकडाऊनमुळे अद्याप या ठिकाणी बंदी आहे. परंतु तरीही तरुण मुले गावापासून 7 किमी दूर जंगलाच्या मार्गाने धबधब्याजवळ आले होते.