एका सायबर घोटाळ्यामध्ये मुंबई च्या 42 वर्षीय महिलेला 6.25 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. एका मराठी मेट्रिमॉनी साईट (Matrimonial Site) वर या महिलेचा आरोपी सोबत संपर्क झाला होता. वेबसाईटवर अरोपीने तो इंडियन नेव्ही कॅप्टन ( Indian Navy Captain) असल्याचं दाखवलं होतं. या फसवणूक प्रकरणामध्ये चारकोप पोलिस स्टेशन मध्ये एफआयआर रजिस्टर केले आहे. इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, मागील वर्षी मार्च महिन्यात Sangam Matrimonial Website वर तरूणीने आपलं प्रोफाईल बनवलं होतं. त्यानंतर तिला मेसेज येण्यास सुरूवात झाली. आरोपीच्या मेसेजवरूनच तक्रार नोंदवण्यात आली आहे.
Alex Patel या नावाने आरोपीने खोटं प्रोफाईल बनवलं होतं. त्याने पीडीत तरूणीला आपण इंडियन नेव्ही मध्ये काम असल्याचं सांगितलं होतं. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले होते. चॅट वर बोलायला सुरूवात केली. पुढे तो तिच्या प्रेमात पडल्याची कबुली देत त्याने तिला कुरियर द्वारा तुला एक गिफ्ट मिळेल असे देखील सांगितले. त्यानंतर एका कुरियर कंपनीचा नोकर असल्याचं सांगत एका माणसाकडून मेसेज आला. त्याने कुरियर मिळावं म्हणून काहि डिलेव्हरी चार्जेस देण्यास सांगितले. नक्की वाचा: Mumbai Online Fraud Case: मालाडमध्ये कंपनीचा क्रेडीट एक्झिक्युटिव्ह सांगत नर्सला घातला 2.46 लाखांचा गंडा, आरोपीने अॅपद्वारे स्क्रीन रेकॉर्डिंग करून काढले पैसे.
तक्रारदार महिलेकडूनही संबंधित रक्कम भरण्यात आली. त्यानंतर काही बहाणा देत अजून काही रक्कम भरण्यास सांगितलं. मग तिने पटेलशी संपर्क केला. त्यानेही तिला पैसे भरण्यासाठी तयार केले. महिलेने एकूण 6.25 लाख भरले. नंतर तिला आपली फसवणूक झाल्याचं समजलं आणि तिने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
पीडितेने आपण अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील असून सारी सेव्हिंग खर्च केल्याचं म्हटलं आहे . पैशांची जुळवा जुळव करण्यासाठी तिने आई व बहिणीचे दागिने गहाण टाकल्याचं देखील म्हटलं आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.