Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

 

महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या माहितीनुसार, काल (30 ऑगस्ट) आज कोरोनाचे 16,408 नवे रुग्ण आढळुन आले असून 296 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ही 7 लाख 80 हजार 689 वर पोहचली असून मृतांचा आकडा 24,399 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्यात काल दिवसभरात 7690 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण 5,62,401 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. सद्य घडीला राज्यात कोरोनाचे केवळ 1,93,548 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Coronavirus Active Cases) आहेत. महाराष्ट्र आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार, आज घडीला मुंंबईला (MumbaI) ही मागे टाकत पुण्यातील (Pune)  कोरोनाबाधितांंची संंख्या सर्वाधिक झाली आहे.

तर राज्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण दगावले असून त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांचा बळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांंची संंख्या दिवसागणिक वाढत असली तरी तितक्याच वेगाने रिकव्हरी रेट सुद्धा वाढत आहे, सध्या राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट हा 72.04 % आहे तर मृत्यु दरात घट होउन तो 3.13 % वर पोहचला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (29 ऑगस्ट रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 4449 291 15390 20130
अकोला 709 155 2994 3859
अमरावती 1126 130 3807 5063
औरंगाबाद 5120 662 16946 22728
बीड 1392 121 3203 4716
भंडारा 442 21 601 1064
बुलढाणा 1106 73 2133 3312
चंद्रपूर 1134 17 1064 2215
धुळे 2159 210 5310 7681
गडचिरोली 198 1 584 783
गोंदिया 602 16 821 1439
हिंगोली 294 35 1120 1449
जळगाव 7435 847 18546 26828
जालना 1265 130 2858 4253
कोल्हापूर 6918 627 14418 21963
लातूर 2748 269 4818 7835
मुंबई 20321 7626 116352 144626
नागपूर 11574 715 14949 27241
नांदेड 3449 217 3227 6893
नंदुरबार 1278 74 1297 2649
नाशिक 11703 864 26373 38940
उस्मानाबाद 1895 152 3733 5780
इतर राज्ये 657 72 0 729
पालघर 6824 588 17838 25250
परभणी 1271 79 1205 2555
पुणे 51909 4060 117205 173174
रायगड 5598 780 23439 29819
रत्नागिरी 1576 141 2367 4084
सांगली 4837 421 7267 12525
सातारा 5346 333 7860 13541
सिंधुदुर्ग 484 20 645 1149
सोलापूर 4821 759 13719 19300
ठाणे 20976 3777 106598 131352
वर्धा 398 17 469 885
वाशिम 338 27 1337 1703
यवतमाळ 1196 72 1908 3176
एकूण 193548 24399 562401 780689

दरम्यान, आज जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या माध्यमातुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार झालेल्या टॉप 10 देशांंच्या यादीतील तब्बल सहा देशांंच्या आकडेवारीला एकट्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांंच्या संख्येने मागे टाकले आहे. ही परिस्थीती असुनही राज्यात मुळ अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी असल्याने आणि रिकव्हरी रेट दिलासादायक असल्याने परिस्थीती नियंंत्रणात आहे असे म्हणता येईल.