Coronavirus Update: पुणे (Pune) शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ (Pune Mayor Murlidhar Mohol) यांंनी पुण्यातील कोरोना परिस्थिती विषयी अपडेट दिले आहे, ज्यानुसार, आज शनिवार 29 ऑगस्ट रोजी पुणे (Coronavirus In Pune) शहरात नव्याने 1,968 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, यानुसार पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांंची संख्या 92,839 झाली आहे. दुसरीकडे आज आनंंदाची वार्ता अशी की आज एकाच दिवसात पुण्यात कोरोनाच्या 1,657 रुग्णांंनी विषाणुवर मात करुन डिस्चार्ज मिळवला आहे यासोबतच एकूण डिस्चार्ज संख्या 75 हजार 184 झाली आहे. सध्या 15,423 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुणे: महाराष्ट्रातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं सुरु करण्यासाठी भाजपचे राज्य सरकार विरोधात घंटानाद आंदोलन
दुसरीकडे आजची मुंंबईतील कोरोनाची परिस्थीती पाहिल्यास आजच्या दिवसात मुंंबई शहरात 1432 कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत. यापुर्वी मुंंबई आणि पुण्यातील कोरोना परिस्थितीची तुलना करताना पुण्यात कोरोना रुग्ण अधिक आढळुन येण्यामागे मोठ्या प्रमाणात होणार्या कोरोना चाचण्यांंचे कारण महापौर मुरलीधर मोहोळ यांंनी दिले होते. आजवर पुण्यात कोरोनाच्या 4 लाख 40 हजार 46 चाचण्या झाल्या आहेत.
मुरलीधर मोहोळ ट्विट
पुणे कोरोना अपडेट : शनिवार, २९ ऑगस्ट,२०२०
शहरात नव्याने १,९६८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ९२,८३९ झाली आहे. तर १,६५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १५,४२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ४,४०,०४६ झाली असून आज ७,०४७ टेस्ट घेण्यात आल्या. pic.twitter.com/fOj25QrGJC
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 29, 2020
दरम्यान आज महाराष्ट्रात मागील 24 तासात राज्यात कोरोनाचे एकुण 16,867 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, यानुसार राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 7,64,281 वर पोहचली आहे. राज्यातील कोरोना बळींंचा आकडा 24,103 इतका आहे तर आजवर राज्यात कोरोनाला हरवुन डिस्चार्ज मिळवलेल्यांंची संख्या 5,54,711 इतकी झाली आहे.