कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रसह (Maharashtra) संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राज्य सरकारने लॉकडाऊनच्या (Lockdown) निर्बंधांना शिथिलता देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील सर्व मंदिर (Temple) आणि धार्मिक स्थळ (Religious Places) गेल्या पाच महिन्यांपासून बंदच आहेत. राज्यात मंदिर सुरु करण्यात यावी, अशी मागणी अनेक राजकीय पक्ष करू लागले आहेत. याच मुद्द्यावरून भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात घंटानाद आंदोलन पुकारले आहे.

देशातील अनेक राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे सुरू झाली आहेत. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मंदिर उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. यासाठीच भाजपच्या वतीने राज्य सरकारविरोधात आज राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सुरू करावीत या मागणीसाठी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरजेत घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिरे त्वरित सुरू करावीत अशी मागणी सदर आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच, उद्धवा अजब तुझे निष्क्रिय सरकार, धार्मिक स्थळ दर्शन बंदी करणाऱ्या उद्धव सरकारचा जाहीर निषेध.. अशी फलके आंदोलनस्थळी लावली गेली होती. हे देखील वाचा- कोरोनातून बरे झालेल्या आणि ब्लड प्लाझ्मा दान केलेल्या रुग्णांच्या कुटूंबाला गोवा सरकारकडून विशेष Health Incentives देण्याची घोषणा

ट्वीट-

या आंदोलनात महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर यावेळी राज्यसरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.