Coronavirus Maharashtra Update: महाराष्ट्रात आज नवे 16,867 कोरोना रुग्ण तर 11,541 जण कोरोनामुक्त, पहा संंपुर्ण आकडेवारी
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update Today: महाराष्ट्रात आजच्या दिवसभरात कोरोनाच्या रुग्ण (Coronavirus In Maharashtra) संंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे, राज्य आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार मागील 24 तासात राज्यात कोरोनाचे एकुण 16,867 नवे रुग्ण आढळुन आले आहेत, यानुसार राज्यातील एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या  (Total COVID 19 Cases)   7,64,281 वर पोहचली आहे. तसेच कालपासुन तब्बल 328 जणांंची कोरोनाच्या विरुद्ध झुंंज अपयशी ठरली परिणामी राज्यातील कोरोना बळींंचा आकडा (Coronavirus Deaths)  24,103 इतका झाला आहे. यात सुदैवाची बाब अशी की, काल पासुन राज्यात 11,541 जण कोरोनामुक्त (Coronavirus Recovered)  झाले आहेत यानुसार आजवर राज्यात कोरोनाला हरवुन डिस्चार्ज मिळवलेल्यांंची संख्या 5,54,711 इतकी झाली आहे.केंद्र सरकारने जारी केलेल्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचना इथे सविस्तर वाचा 

आपण जर का कोरोनाच्या एकुण आकड्यावरुन नजर हटवुन अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आणि बरे झालेल्या रुग्णांंची आकडे पाहिलेत तर आपल्याला कळेल की कोरोनाचा प्रसार दिवसागणिक नियंंत्रणात येत आहे. सध्या कोरोनाचे केवळ 1,85,131 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संंपुर्ण राज्यात आहेत. राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट हा 72.58 टक्के आहे, तर मृत्युदर अवघा 3.15 टक्के आहे.

ANI ट्विट

दरम्यान आज केंद्र सरकार कडुन देशभरातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स बाबत घोषणा करण्यात आली आहे. यानुसार 7 सप्टेंबर पासुन मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्याला परवानगी आहे, तर देशात शाळा कॉलेज मात्र 30 सप्टेंबर पर्यंत बंंदच राहतील असे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात सुद्धा हे नियम लागु असतील.