Coronavirus Update: महाराष्ट्र पोलिस दलात आजवर 14,189 जणांंना कोरोनाची लागण, 24 तासात आढळले 122 नवे रुग्ण
Police | Image Used for Representational Purpose Only | (Photo credits: PTI)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्र पोलिस दलात (Maharashtra Police) मागील 24 तासात कोरोनाचे 122 नवे रुग्ण आढळुन आल्याने एकुण कोरोनाबाधित पोलिस कर्मचार्‍यांची संख्या 14,189 वर पोहचली आहे. कालच्या दिवसात कोरोनाने झालेल्या 2 मृत्युंसह एकुण बळींंचा आकडा सुद्धा 144 इतका झाला आहे. सध्या पोलिस दलात 2,622 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असुन आजवर 11,423 जणांंनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील कर्मचारी कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासुन लॉकडाऊनचे (Lockdown) व्यवस्थापन पाहताना 24 तास ऑन ड्युटी आहेत. कोरोनाची लागण होउन रिकव्हर झालेले कर्मचारी सुद्धा आपल्या कामात पुन्हा रुजु होत आहेत. सध्या अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या रुग्णांपैकी गंंभीर परिस्थीती असलेल्या रुग्णांंवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांंना घरीच आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात 7 लाखाहुन अधिक कोरोना रुग्ण, मुंंबई, पुणे सह तुमच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित जाणुन घ्या.

दुसरीकडे राज्यात कालच्या दिवसभरात, 10,425 रुग्ण आढळले असून 329 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,03,823 वर पोहोचली आहे.आजवर राज्यात एकूण 5,14,790 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

ANI ट्विट

दरम्यान,आजपासून पुण्यात (Pune) ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीची (COVID-19 Vaccine) चाचणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी 3 महिला आणि 3 पुरुषांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे आरटी- पीसीआर आणि अँटीबॉडी चाचणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांचे अहवाल अनुकूल आले तर, लसीचा डोस दिला जाणार आहे.