Coronavirus Update: महाराष्ट्रात 7 लाखाहुन अधिक कोरोना रुग्ण, मुंंबई, पुणे सह तुमच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित जाणुन घ्या.
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य विभागाने (Maharashtra Health Department) दिलेल्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोनाचे 10,425 रुग्ण आढळले आहेत ज्यानुसार राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या (Coronavirus Total Numbers)  7,03,823 वर पोहोचली आहे. मागील 24 तासात राज्यात 12,300 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 5,14,790 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात (Coronavirus Recovered Cases) केली आहे. दुर्दैवाने कालच्या दिवसात 329 कोरोना रुग्णांंचा मृत्यु झाला असुन आजवरच्या मृतांंची संख्या 22,794 (COVID 19 Deaths) वर पोहचली आहे. या आकडेवारी जिल्हानिहाय पाहायला गेल्यास तुम्ही राहत असणार्‍या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणुन घ्या. मुंंबई,पुणे सह महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे पाहण्यासाठी खालील तक्ता तपासुन पाहा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी (26 ऑगस्ट)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1, 37 683 7477
2 ठाणे 18, 292 475
3 ठाणे मनपा 25, 464 930
4 नवी मुंबई मनपा 26,230 600
5 कल्याण डोंबिवली मनपा 30,182 621
6 उल्हासनगर मनपा 7725 282
7 भिवंडी निजामपूर मनपा 4372 311
8 मीरा भाईंदर 11,996 405
9 पालघर 7319 127
10 वसई विरार मनपा 16,481 432
11 रायगड 15,583 445
12 पनवेल मनपा 11,446 278
ठाणे मंडळ एकूण 3,12,773 12,383
1 नाशिक 8182 208
2 नाशिक मनपा 23,118 446
3 मालेगाव मनपा 2328 110
4 अहमदनगर 9738 145
5 अहमदनगर मनपा 7554 99
6 धुळे 3521 98
7 धुळे मनपा 3256 91
8 जळगाव 17,791 625
9 जळगाव मनपा 5526 155
10 नंदुरबार 1945 60
नाशिक मंडळ एकूण 82,959 2037
1 पुणे 21,555 673
2 पुणे मनपा 91,485 2381
3 पिंप्री-चिंचवड मनपा 41,999 766
4 सोलापूर 10,955 280
5 सोलापूर मनपा 6590 417
6 सातारा 10,490 308
पुणे मंडळ एकुण 1,83,074 4828
1 कोल्हापूर 13,119 378
2 कोल्हापूर मनपा 5571 142
3 सांगली 3761 129
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 5995 190
5 सिंधुदुर्ग 1010 16
6 रत्नागिरी 3524 125
कोल्हापूर मंडळ एकुण 32,890 980
1 औरंगाबाद 7309 116
2 औरंगाबाद मनप 14,097 505
3 जालना 3948 123
4 हिंगोली 1274 29
5 परभणी 1054 34
6 परभणी मनपा 1139 35
औरंगाबाद मंडळ  28,881 842
1 लातूर 4002 146
2 लातूर मनपा 2838 97
3 उस्मानाबाद 5273 136
4 बीड 4291 97
5 नांदेड 3174 83
6 नांदेड मनपा 2311 79
लातूर मंडळ एकूण 21,889 638
1 अकोला 1474 57
2 अकोला मनपा 2090 92
3 अमरावती 1148 32
4 अमवरावती मनपा 3336 78
5 यवतमाळ 2639 64
6 बुलढाणा 2857 69
7 वाशीम 1467 24
अकोला मंडळ एकूण 15, 011 416
1 नागपूर 5355 76
2 नागपूर मनपा 15, 758 470
3 वर्धा 634 13
4 भंडारा 787 15
5 गोंदिया 1088 14
6 चंद्रपूर 1058 8
7 चंद्रपूर मनपा 452 7
8 गडचिरोली 614 1
नागपूर मंडळ एकूण 25, 746 604
1 इतर राज्य 660 66
एकूण 7, 03, 328 22,794

दरम्यान, राज्यात सद्य घडीला 1,65,921 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात रिकव्हरी रेट 73.14% इतका झाला आहे. तर मृत्यूदर 3.24% इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 37,24,911 कोरोना चाचण्या झाल्या आहेत.