Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या (Coronavirus Positive) वाढत असून ताज्या अपडेट्सनुसार, काल (21 सप्टेंबर) दिवसभरात राज्यात कोरोनाचे 15,738 नवे रुग्ण आढळले असून 344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 12 लाख 24 हजार 380 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 33,015 वर (COVID-19 Death Cases) पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सद्य घडीला 2 लाख 74 हजार 623 रुग्णांवर (COVID-19 Active Cases) उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे दिलासादायक गोष्ट म्हणजे राज्यात कोरोनाचे रुग्ण होण्याचे प्रमाण हे झपाटयाने वाढत असून काल दिवसभरात 32,007 रुग्णांनी कोरोनावर मात करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनाशी यशस्वी झुंज देणा-या रुग्णांचा आकडा 9 लाख 16 हजार 348 वर (COVID-19 Recovered Cases) पोहोचला आहे.

राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत असून येथील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,86,150 इतकी झाली आहे. त्यापाठोपाठ पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. Coronavirus Update In Mumbai: मुंबईत कोरोनाचा हाहाकार! आज 1,837 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 36 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (21 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)  

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 8524 581 26919 36024
अकोला 2179 199 4000 6379
अमरावती 2255 222 8484 10961
औरंगाबाद 8738 841 23244 32823
बीड 3067 242 5420 8729
भंडारा 1891 74 2085 4050
बुलढाणा 2046 105 4300 6451
चंद्रपूर 4080 73 3539 7692
धुळे 1353 324 10028 11707
गडचिरोली 360 8 1206 1574
गोंदिया 1880 54 2840 4774
हिंगोली 527 51 1987 2565
जळगाव 8827 1145 33374 43346
जालना 1897 179 4678 6754
कोल्हापूर 7956 1112 29387 38455
लातूर 3777 433 10748 14958
मुंबई 26858 8505 150535 186276
नागपूर 18491 1748 45087 65331
नांदेड 6533 345 6805 13683
नंदुरबार 1143 112 3452 4707
नाशिक 14312 1157 49783 65252
उस्मानाबाद 2890 291 7264 10445
इतर राज्ये 766 117 428 1311
पालघर 6307 774 27025 34106
परभणी 1387 152 3209 4748
पुणे 62758 5306 195651 263715
रायगड 8502 1011 37023 46538
रत्नागिरी 2852 229 4477 7558
सांगली 10641 966 20623 32230
सातारा 8737 745 21161 30645
सिंधुदुर्ग 1346 57 1713 3116
सोलापूर 7279 1059 23448 31787
ठाणे 29779 4546 137934 172260
वर्धा 960 36 2005 3002
वाशिम 777 66 2619 3463
यवतमाळ 2948 150 3867 6965
एकूण 274623 33015 916348 1224380

राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकवरी रेट) 74.84% इतका आहे. तर, मृत्यू दर अवघा 2.7% इतका आहे. कोरोना व्हायरस चाचणीसाठी आतापर्यंत 59,12,258 इतके नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 12,24,380 जणाची कोरना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली.कोरोना व्हायरस संसर्गाचा राज्यातील सरासरी दर हा 20.71% इतका राहिला आहे. राज्यात आतापर्यंत 18,58,924 इतके नागरिक होम क्वारंटीन आहेत. तर, 35,517 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.