Coronavirus Update In Mumbai: भारतापुढील कोरोना विषाणूचं संकट अधिक गडद होताना दिसत आहे. देशात दररोज हजारो रुग्णांना कोरोनाचे संक्रमण होत आहे. अशातच जास्त घनता असणाऱ्या शहरांचा सर्वाधिक समावेश आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, पालघर, आदी जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज मुंबई शहरात 1,837 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. तसेच 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.
याशिवाय आज मुंबईतील 2,728 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 1,86,150 इतका झाला आहे. तसेच आतापर्यंत 1,50,535 जणांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी झाली आहे. मात्र, 8,502 रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. सध्या मुंबईमध्ये 26,735 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा - Mumbai Rain Update: मागील 6 तासात मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस; शहरात पुढील 3 ते 4 तास ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता)
Mumbai reported 1,837 new COVID-19 cases, 2,728 recoveries and 36 deaths in the last 24 hours, taking total cases to 1,86,150 including 1,50,535 recoveries, 8,502 deaths and 26,735 active cases: Brihanmumbai Municipal Corporation (BMC), Maharashtra pic.twitter.com/i5OuBYLD8Y
— ANI (@ANI) September 21, 2020
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहरातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी झपाट्याने वाढलेली दिसून येत आहे. याशिवाय आज राज्यात 15,738 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 344 जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यात 32,007 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 12,24,380 वर पोहोचला आहे. सध्या 2,74,623 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.