Coronavirus Update: महाराष्ट्रात कोरोना व्हायरस चा धुमाकूळ; पहा आजची कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Update In Maharashtra 22 July: महाराष्ट्रात (Maharashtra) कालच्या दिवसभरात तब्बल 8 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली होती, यानुसार आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 27 हजार 31 इतकी झाली आहे. आजवर कोरोनाच्या लढ्यात एकूण 12  हजार 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे यातील 246 मृत्यू हे कालच्या दिवसभरातील आहेत. तर दुसरीकडे, 1 लाख 82 हजार 217 रुग्णांनी आजवर कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी रित्या जिंकली आहे. सद्य घडीला राज्यात एकूण 1 लाख 32 हजार 236 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. कालच्या दिवसात मुंबई मध्ये सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती. प्राप्त माहितीनुसार, मुंबईमधील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 1,03,262 वर पोहोचली आहे यापैकी 73,555 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आजपर्यंत शहरामध्ये 5,814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती उत्तम असल्याची माहिती

पुणे जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. केवळ मुंबई पुणेच नाही तर तुलनेने कमी लोकसंख्येच्या जिह्यात जसे की, बीड, औरंगाबाद, सांगली या ठिकाणी सुद्धा कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या सर्व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची सविस्तर आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालची तक्ता तपासून पहा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी (22 जुलै)

अ.क्र. जिल्हा/मनपा बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई मनपा 1,03,368 5817
2 ठाणे 11, 068 220
3 ठाणे मनपा 17,607 626
4 नवी मुंबई मनपा 13,475 365
5 कल्याण डोंबिवली मनपा 18,981 319
6 उल्हासनगर मनपा 6086 107
7 भिवंडी निजामपूर मनपा 3475 229
8 मीरा भाईंदर 7440 230
9 पालघर 2562 32
10 वसई विरार मनपा 10,003 221
11 रायगड 6590 118
12 पनवेल मनपा 5566 118
ठाणे मंडळ एकूण 2,06,221 8402
1 नाशिक 2420 90
2 नाशिक मनपा 6569 200
3 मालेगाव मनपा 1266 86
4 अहमदनगर 1050 28
5 अहमदनगर मनपा 868 10
6 धुळे 1070 46
7 धुळे मनपा 992 39
8 जळगाव 5950 341
9 जळगाव मनपा 2005 79
10 नंदुरबार 438 19
नाशिक मंडळ एकूण 22,682 938
1 पुणे 6011 152
2 पुणे मनपा 41,534 1081
3 पिंप्री-चिंचवड मनपा 12,200 224
4 सोलापूर 2193 57
5 सोलापूर मनपा 4073 342
6 सातारा 2564 90
पुणे मंडळ एकुण 68,575 1946
1 कोल्हापूर 2122 32
2 कोल्हापूर मनपा 291 5
3 सांगली 695 23
4 सांगली मिरज कुपवाड मनपा 331 10
5 सिंधुदुर्ग 288 5
6 रत्नागिरी 1273 42
कोल्हापूर मंडळ एकुण 5000 117
1 औरंगाबाद 2583 44
2 औरंगाबाद मनप 7698 345
3 जालना 1516 57
4 हिंगोली 443 3
5 परभणी 248 8
6 परभणी मनपा 150 3
औरंगाबाद मंडळ एकूण 12,638 460
1 लातूर 721 40
2 लातूर मनपा 510 19
3 उस्मानाबाद 556 28
4 बीड 389 9
5 नांदेड 389 16
6 नांदेड मनपा 557 23
लातूर मंडळ एकूण 3122 135
1 अकोला 582 28
2 अकोला मनपा 1557 71
3 अमरावती 203 13
4 अमवरावती मनपा 1137 35
5 यवतमाळ 553 20
6 बुलढाणा 561 24
7 वाशीम 387 9
अकोला मंडळ एकूण 4980 200
1 नागपूर 548 4
2 नागपूर मनपा 2102 30
3 वर्धा 75 2
4 भंडारा 187 2
5 गोंदिया 230 3
6 चंद्रपूर 181 0
7 चंद्रपूर मनपा 69 0
8 गडचिरोली 199 1
नागपूर मंडळ एकूण 3591 42
1 इतर राज्य 276 36
एकूण 3,27, 031 12,276

दरम्यान, देशात आजवर 11,55,191 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4,02,529 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. तर आज पर्यंत 7,24,578 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दुर्दैवाने आजवर 28084 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आकडेवारीनुसार रिक्वहरी रेट हा मृत्यू दार किंवा रुग्णसंख्येपेक्षा अधिक असल्याने परिस्थिती नियंत्रणार आहे असे म्हणता येईल.