कोरोनाचा कहर सुरूच! देशात 24 तासात 37,148 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णांची संख्या 11,55,191 वर, पहा सविस्तर आकडेवारी
Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In India: देशात आज पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात 37,148 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तसेच 587 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 11,55,191 वर पोहचला आहे. यापैकी 4,02,529 ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत. तर आज पर्यंत 7,24,578 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दुर्दैवाने आजवर 28084 जणांना कोरोना विरुद्ध लढ्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान आपण सध्याचा कोरोना ऍक्टिव्ह रुग्णांची आणि रिकव्हर झालेल्या रुग्णांची सरासरी पाहिली तर परिस्थिती बहुतांशी आपल्या हातात असल्याचे दिसून येतेय.

आयसीएमआर च्या माहितीनुसार, देशात आता झपाट्याने कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. आजवर एकूण 1 कोटी 43 लाख 83 हजार आणि 303 कोरोना चाचण्या झाल्या आहेत, यातील तब्बल 3,33,395 चाचण्या तर मागील 24 तासांच्या कालावधी मध्ये झाल्या आहेत.

ANI ट्विट

दरम्यान,ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोना व्हायरस लसीबद्दल सकारात्मक बातमी समोर आली असून ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे आणि ती कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला प्रशिक्षण देते. असे समजत आहे. या इंजेक्शनमुळे कोरोना व्हायरसशी लढा देऊ शकणाऱ्या अँटीबॉडीज आणि पांढऱ्या रक्त पेशी शरीरामध्ये निर्माण झाल्या असे सिद्ध झाले आहे.