पुण्यामध्ये प्राण्यांच्या आकसापोटी काही कुत्रे (Dogs) आणि मांजरी (Cats) यांची सामुहिक हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 14 कुत्रे आणि 6 मांजरांना विष देऊन त्यांना क्रुरपणे मारण्यात आलं आहे. येरवड्याच्या ट्रायडल नगर सोसायटीमध्ये ( Tridal Nagar Pune) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. महिन्याभरात टप्प्याटप्प्याने ही हत्या करण्यात आली आहे.
सोसायटीतील पाळीव प्राण्यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली याचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. मात्र मृत पावलेल्यांमध्ये कुत्र्यांच्या पिल्लांचाही समावेश आहे. विषबाधेतून हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या क्रुर प्रकारानंतर स्थानिकांनी आणि प्राणीप्रेमींनी नजीकच्या पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे.
सोसायटी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित स्थितीमध्ये नव्हते परिणामी पोलिसांना नेमके फूटेज मिळवणं कठीण आहे.