Coronavirus Positive Cases In Mumbai: मुंबईत आज 204 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1753 वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत 111 जणांना कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.
दरम्यान, सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, आज महाराष्ट्रात 352 नवीन कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2334 वर पोहोचली आहे. याशिवाय 24 तासांत 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 1463 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 10,815 वर पोहोचली आहे. यातील 9272 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 1190 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत 353 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Bandra News: लॉक डाऊनचा उडाला फज्जा: संचारबंदी असताना मुंबईच्या बांद्रा परिसरात गावी जाण्यासाठी हजारो लोकांची गर्दी (Video))
204 #Coronavirus positive cases and 11 deaths reported in Mumbai today. The total number of positive cases in Mumbai rises to 1753 (including 111 deaths): Municipal Corporation Greater Mumbai
— ANI (@ANI) April 14, 2020
महाराष्ट्रातील कोरोना (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईतील काही ठिकाणं ही कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. तरीदेखील नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे दाट लोकवस्ती असेलेल्या भागात आता मुंबई पोलिसांकडून ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे.