शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाने मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी खोटी पार्सल घेऊन येऊन पैसे उकळणारा तरूण पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. खेरवाडी पोलिसांनी 19 वर्षीय धीरज मोरे याला अटक केली आहे. आदित्य ठाकरेंच्या अनुपस्थितीमुळे तीन वेळेस धीरजने खोटी पार्सल सांगून पैसे उकळले मात्र चौथ्यांदा आदित्य घरातच होते. जेव्हा गेटवरून सुरक्षा रक्षकाने पार्सलबाबत सांगितले तेव्हा आपण कोणती गोष्टी ऑर्डर केलीच नाही असं सांगितल्यानंतर सारा प्रकार उघडकीस आला. यानंतर धीरजला पोलिसांनी कोठडीत टाकलं. ऑनलाईन खरेदीवर अशा पद्धतीने असते गुगल ची करडी नजर
आदित्य ठाकरे यांच्यावर चार वेळेस आणि त्याआधी इतर राजकीय मंडळींसोबतही हाच प्रकार धीरजने केला होता. त्यावेळेसही तो पोलिसांच्या तावडीत सापडला होता. सध्या तो जामिनाबाहेर बाहेर पडला आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा रक्षकांना आणि यापूर्वी तीन वेळेस पार्सल घेतलेल्या शिवसैनिकांना फसवणूकीचा अंदाज आला नाही. आदित्य ठाकरे काम आणि जनआशिर्वाद यात्रा यामुळे घरात नसल्याने त्यांच्याकडे विचारणा झाली नाही मात्र चौथ्यांदा हा प्रकार घडला तेव्हा ते घरातच होते. आणि ई शॉपिंगच्या नावाखाली गंडा घातल्याचं उघड झालं.
धीरज कमी किंमतीच्या वस्तू पार्सलमध्ये ठेवून त्याच्या बदल्यात अधिक रक्कम वसूल करत होता. यामध्ये पुस्तक, हेडफोन्स आणि कम्युटर अॅक्सेसरीजचा समावेश होता.