तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत? पहा महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येने काल 3 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कालच्या दिवसभरात राज्यात 8 हजार 348 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 144 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानुसार, आतापर्यंत राज्यात एकूण 3,00,937 कोरोनारुग्ण आढळले आहेत. यापैकी 11 हजार 596 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये दिलासादायक बाब अशी की, काल राज्यातील 5 हजार 307 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानुसार आतापर्यंत राज्यातील 1 लाख 65 हजार 663 जण कोरोनमुक्त झाल्याचे समजतेय. (हे ही वाचा - भारतातील सर्व बड्या शहरांपैकी फक्त मुंबईच कोरोनाबाधित रुग्णांच्याबाबतीत खरी व पारदर्शक आकडेवारी देत आहे; राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ट्वीट‌)

काल मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत अनुक्रमे 1199 आणि 1838 रुग्णांची नोंद झाली त्याचबरोबर ठाणे, जळगाव , औरंगाबाद येथे सुद्धा कोरोना रुग्ण वाढले आहेत. या व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची कोरोना बाधितांची आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील तक्ता तपासून पहा.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्हा संक्रमित रुग्ण मृत्यू बरे झालेले रुग्ण
Mumbai 1,00,350 5650 70,492
Thane 73,289 1967 34,017
Pune 51,575 1314 18, 881
Palghar 11,566 234 6241
Raigad 10,841 211 5733
Aurangabad 9455 364 5234
Nashik 8968 375 5085
Jalgaon 7166 382 4515
Solapur 5318 382 2433
Nagpur 2483 24 1428
Akola 2018 96 1623
Satara 2254 75 1217
Dhule 1814 82 1227
Kolhapur 1862 29 904
Jalna 1298 54 661
Ratnagiri 1125 40 686
Ahmadnagar 1220 33 705
Amravati 1125 45 737
Latur 1015 48 434
Sangli 870 21 440
Nanded 780 34 403
Yavatmal 508 16 349
Buldhana 482 22 225
Osmanabad 481 24 296
Hingoli 387 3 295
Nandurbar 360 16 172
Sindhudurg 271 5 229
Beed 323 8 152
Gondia 225 3 186
Parbhani 309 7 157
Washim 2314 5 134
Chandrapur 214 0 134
Bhandara 170 2 100
Gadchiroli 173 1 105
Wardha 66 1 33
Other States 248 32 0
Total 3,00,937  11,596 1,65, 663

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग तर्फे संवाद साधला. यावेळी शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले तसेच कोणत्याही तणावाखाली येऊन लॉक डाऊन लागू करू नका अशा सूचना सुद्धा केल्या आहेत.