भिवंडी: PUBG गेम खेळण्यावरुन आई रागवल्याने 17 वर्षीय मुलाने घर सोडले
PUBG (Photo Credit: File Photo)

तरुणांमध्ये PUBG खेळाच्या वाढत्या प्रस्थाची कल्पना आपल्याला आहे. या खेळाचे व्यसन अनेकांच्या जीवावर बेतले आहे तर यामुळे काहींचे वैयक्तिक नुकसान झाले आहे. तरी देखील या खेळाची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही.

PUBG खेळाच्या नादामुळे एका 17 वर्षीय मुलाने घर सोडल्याची घटना भिवंडी येथून समोर आली आहे. 'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, भिवंडी शहरातील मानसरोवर येथे राहणारा मयुर राजेंद्र गुळुंजकर याला पबजी खेळण्याचे व्यसन जडले होते. सातत्याने गेम खेळत असल्याने त्याला आई रागावत असे. असेच एके दिवशी आई रागावली आणि मामाला तुझे नाव सांगते अशी ताकीद दिली. त्यानंतर आईने बहिणीला आणायला त्याला भिवंडी रेल्वे स्टेशनला पाठवले. PUBG गेमचे वेड ठरले जीवघेणे; सातत्याने 45 दिवस गेम खेळल्याने तेलंगणा येथे 20 वर्षीय मुलाचा मृत्यू

बहिणीला आणायला भिवंडी स्टेशनात गेलेल्या मयुरने रेल्वे परिसरात बाईक चावीसह सोडून निघून गेला. बाईकच्या समोरील हॅंडलवर त्याने मोबाईलही अडकवला होता. भारतामध्ये PUBG Addiction रोखण्यासाठी खेळावर सहा तासांची मर्यादा? Screen Shot व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण

भिवंडी स्टेशनला पोहचल्यानंतर बहिणीने मयुरला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलिस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत.