Image used for representational purpose | Photo Credits: File Photo

मुंबई: विक्रोळी (Vikhroli) परिसरात बकरीच्या हल्ल्याने 13 वर्षीय लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. विक्रोळी येथील सूर्या नगर(Surya Nagar) मध्ये इस्लामपुरा (Islampura) भागात राहणारा 'सरताज लियाकत अली' आपल्या मित्रांसोबत खेळत असताना अचानक एका बेभान सुटलेल्या एका बकरीने आपली शिंगं या लहानग्याच्या पोटात खुपसून हल्ला केला, अशी माहिती महाराष्ट्र टाइम्स ने दिली आहे. या बेसावध हल्ल्यात जखमी झालेल्या लियाकतला यानंतर तातडीने लगतच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.मृत सरताजच्या प्रेतावर रविवारी पोस्टमार्टम नंतर दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरताजच्या मृत्यूनंतर मात्र या परिसरात एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले आहे, सरताजचा मृत्यू बकरीच्या मालकाला दोषी धरत या बेजबाबदारपणा मुळेच ही घटना घडली असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे याशिवाय अशा प्रकारच्या हल्ल्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही अशा प्रकारेच अनेक मुले जखमी झाली होती मात्र यावेळेस साताजवर थेट मृत्यूचेच संकट ओढावल्याने हा वाद आणखीनच चिघळला गेला आहे. नागरिकांचा तीव्र संताप बघूनही पोलीस प्रशासन या घटनेला अपघात म्हणत बकरीच्या मालकाला अटक करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत. असे नागरिकांनी महाराष्ट्र टाइम्सला सांगितले.

ज्योतिष महिलेवर टेलिव्हिजन अभिनेत्याने बलात्कार केल्याचा आरोप, एफआयआर दाखल

याबाबत अधिक माहिती देताना सरताजचे वडील लियाकत अली सांगतात की, सरताज इयत्ता सहावीत शिकत असून काही दिवसांपूर्वी विक्रोळीला आई वडिलांकडे राहायला आला होता, शिक्षणासाठी उत्तर प्रदेशात राहणारा सरताज विक्रोळीत आल्यापासून खूप आनंदात होता. सरताज बरा होईल असे डॉक्टरांनी सुरुवातीला सांगितले होते. त्याचा पाय तुटला होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याची तब्येत खालावली.'

यासोबत  लियाकत अली यांनी या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व पोलिसांनी यासंदर्भात आपली एफआयआर नोंदवून घ्यावी अशी मागणी केले आहे., सरताजच्या छातीत मार लागल्याचे पोस्टमार्टम अहवालात नमूद करण्यात आले आहे.