ज्योतिष महिलेवर टेलिव्हिजन अभिनेत्याने बलात्कार केल्याचा आरोप, एफआयआर दाखल
मुंबईतील (Mumbai) एका टेलिव्हिजन अभिनेत्याने ज्योतिष महिलेवर कथित रुपात बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुंबईतील (Mumbai) एका टेलिव्हिजन अभिनेत्याने ज्योतिष महिलेवर कथित रुपात बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.
तर पीडित महिलेने पोलिसांना असे सांगितले की, आरोपीने बलात्कार केल्याचा व्हिडिओ बनवत तिला धमकवत होता. तसेच पैसे सुद्धा आरोपीने उकळले असल्याचे तिने ओशिवारा येथील पोलीस स्थानकात म्हटले आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार, ऑक्टोंबर 2016 मध्ये एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर एके दिवशी आरोपीने मला त्याच्या घरी बोलावून तुझ्याशी लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने कथित रुपात पीडित महिलेला नारळ पाणी प्यायल्या दिल्यानंतर काही वेळाने तिला चक्कर येऊन खाली पडली. त्याचवेळी आरोपीने माझ्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने म्हटले आहे.(डोंबिवली: पॉर्न व्हिडिओ दाखवून शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ)
या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर पीडित महिलेने केलेल्या आरोपांवरुन अधिक तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2019 10:21 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

