डोंबिवली: पॉर्न व्हिडिओ दाखवून शेजाऱ्याकडून अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ
Representational Image (Photo credits: Pixabay)

एका अल्पवयीन मुलाला पॉर्न व्हिडिओ (Porn Video) दाखवून त्याच्यावर लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली (Dombivli) येथील कोळेगाव (Kolegaon) येथून समोर आली आहे. या प्रकरणी मानपडा पोलिसांनी आरोपी दिनेश लावहरी (Dinesh Lawhari) याला अटक केली आहे. पीडित मुलगा हा 9 वर्षांचा आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी दिनेश लावहरी हा पीडित मुलाच्या शेजारी पत्नीसमवेत राहतो. दिनेशने पीडित मुलाला आपल्या घरी नेले. पॉर्न व्हिडिओ दाखवून त्याच्यावर लैगिंक अत्याचार केले. इतकंच नाही तर त्याने मुलाला मारहाणही केली. (वर्धा: आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचा,अल्पवयीन मुलाने केला खून)

मुलाला मारहाण झाल्याचे त्याच्या आईला कळताच आईने मुलाला त्याबद्दल विचारले. तेव्हा पीडित मुलाने सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने मानपाडा पोलिसात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.