Coronavirus| Representational Image| (Photo Credits: PTI)

Coronavirus Cases In Mumbai: मुंबईमध्ये (Mumbai) आज 1,282 रुग्णांची कोरोना चाचणी (Corona Test) पॉझिटिव्ह आली आहे. तसेच 68 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 88,795 इतकी झाली आहे. आज मुंबईतील 513 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

मुंबई शहरात आतापर्यंत 59,751 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या 23,915 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे मुंबईमध्ये आतापर्यंत 5129 रुग्णांचा कोरोना विषाणूमुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation) माहिती दिली आहे. (हेही वाचा - कोरोनामुक्त मुंबईसाठी स्वयंसेवी संस्थांनी शहरातील झोपडपट्टयांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन)

आज मुंबईत 820 संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण हे मुंबई शहरात आढळून येत आहेत.दरम्यान, आज महाराष्ट्रात 6,875 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 219 रुग्णांचा कोरोची लागण झाल्याने मृत्यू झासा आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2,30,599 इतकी झाली आहे.

दरम्यान, मुंबईतील झोपडपट्टी भागात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविणे तसेच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महानगरपालिकचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधला. मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करताना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात. घरोघरी जाऊन तपासणी करावी आणि कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.