Mumbai-Ahmedabad Bullet Train Project पालघर मध्ये 12 गावांनी दिली जमीन
Bullet Train (Representational Image: PTI)

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट (Mumbai-Ahmedabad Bullet Train Project) ला आता पुन्हा गती मिळाली आहे. या प्रोजेक्टसाठी National High-Speed Rail Corporation Limited ला पालघर मधील 12 गावांनी आपली जमीन देण्यास परवानगी दिली आहे. ग्रामसभेमध्ये पालघर मधील या 12 गावांनी आपली जमीन प्रकल्पाला देण्यास मंजुरी दिली आहे. बुलेट ट्रेन मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर मधून जाणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प नेमका काय आहे? त्याला विरोध का? खर्च, जमीन आणि कर्ज घ्या जाणून.

संदीप पवार या पालघर तालुक्यातील लॅन्ड अ‍ॅक्विझिशन ऑफिसरने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, 'आमच्या रेकॉर्डनुसार, 19 गावं PESA Act खाली असून त्यांनी मंजुरी दिली आहे. अद्यापही 10 गावांचा विरोध कायम आहे. आम्ही त्यांच्यांशी चर्चा करत आहोत. असं देखील म्हटलं आहे.

आता प्रोजेक्ट साठी 85% जमीन ग्रहण करण्यात आली आहे. आता PESA Actअंतर्गत फक्त 10 गावांना ग्रहण करणं बाकी आहे. वसई मध्ये 2000 भाडेकरूंना आता इतरत्र हलवण्याचं काम सुरू आहे. काही भाडेकरूंना घरं देण्यासाठी काही इमारती पाडण्याचं काम सुरू होणार आहे. त्याद्वारा नवीन घरं मिळतील.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,ठाणे आणि भिवंडी मध्ये 75 एकर जागा घेतली आहे. जमिन मालकाकडून 42 एकर जागा घेतली आहे.