COVID19 Cases In Mumbai: मुंबईत आज 1115 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर, तर 57 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

COVID19 Cases In Mumbai: चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. भारतात 13 लाख पेक्षा अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. महाराष्ट्रातदेखील (Maharashtra) साडेतीन लाखपेक्षा जास्त नागरिक कोरोनाच्या विळख्या अडकले आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबई शहरात आढळून येत आहेत.

मुंबईत आज 1115 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तसेच दिवसभरात 57 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज मुंबई शहरातील 1 हजार 361 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. (हेही वाचा - भारतात COVID19 चा रिकव्हरी रेट 63.92 टक्क्यांवर पोहचला; 36,145 रुग्णांची प्रकृती सुधारल्याची आरोग्य विभागाची माहिती)

दरम्यान, आज मुंबई शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 9 हजार 96 इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत शहरातील 80 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. परंतु, 6 हजार 90 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज अपयशी ठरली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.