COVID19 Cases In Maharashtra Today: महाराष्ट्रात आज 9 हजार 431 रुग्णांची नोंद; 267 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 9 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 75 हजार 799 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 13 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) आज तब्बल 9 हजार 431 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 3 लाख 75 हजार 799 वर पोहचली आहे. यापैकी 2 लाख 13 हजार 238 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 601 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक कठोर पावले उचलली जात आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे समजत आहे. सध्या भारतात एकूण 13 लाख 85 हजार 522 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 32 हजार 63 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 8 लाख 85 हजार 577 जण कोरोनामुक्त झाले आहेत. हे देखील वाचा- कोविड-19 संकटात बेरोजगारांना मोठा दिलासा; ऑनलाईन रोजगार मेळावे, महास्वयंम वेबपोर्टलमार्फत तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार
एएनआयचे ट्वीट-
Maharashtra reports 9,431 new #COVID19 cases and 267 deaths today. The total number of cases in the state rises to 3,75,799 including 1,48,601 active cases and 2,13,238 discharged cases. Recovery rate in the state is 56.74%: State Health Department pic.twitter.com/flBJ6QQMf3
— ANI (@ANI) July 26, 2020
कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा राज्यातला दर आणखी सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट 56.74 वर पोहचला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2020 08:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

