Mumbai Shocker: पतंग उडवताना टेरेसवरून पडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू; मीरा रोड येथील घटना
Kite, Death Image (Photo Credit - pixabay)

Mumbai Shocker: मुंबईतील मीरा रोड (Mira Road) येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंगळवारी संध्याकाळी पतंगाचा (Kite) पाठलाग करताना एका 11 वर्षीय मुलाचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून पडून मृत्यू झाला. मीरा रोडच्या नया नगर परिसरात असलेल्या सरयू कॉम्प्लेक्समध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत मुलाचे नाव हमजा कुरेशी (वय, 11) असे असून तो उर्दू माध्यमाच्या शाळेतील चौथीच्या वर्गात शिकत होता. पंतग पकडण्याच्या प्रयत्नात हमजाचा तोल गेला आणि तो निवासी संकुलाच्या टेरेसवरून खाली कोसळला.

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तसेच पायाला फ्रॅक्चर झालेल्या मुलाला तात्काळ सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे दाखल केल्यानंतर काही मिनिटांतच त्याला मृत घोषित करण्यात आले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या संदर्भात नया नगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा -NMMT Bus Hits Several Vehicles In Uran: उरणमधील खोपटा कोप्रोली रोडवर भरधाव बसची अनेक वाहनांना धडक; एक ठार, पहा अपघाताचा थरार)

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिंडोशी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराचा द्रुतगती महामार्गावर दुचाकीवरून जात असताना पतंगाच्या दोरीने गळा चिरल्याने मृत्यू झाला होता. समीर सुरेश जाधव (वय 37) हे वरळीतील हवालदार बीडीडी येथील रहिवासी होते. (हेही वाचा - Sambhaji Nagar Accident: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; तीन भावंडांचा मृत्यू)

दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव हे घरी परतत असताना सांताक्रूझ पूर्वेतील वाकोला येथील उड्डाणपुलाजवळ त्यांचा गळा पतंगाच्या तारेने कापला. त्यामुळे जाधव दुचाकीवरून खाली पडले. खेरवाडी बीट चौकीच्या अधिकाऱ्यांनी जाधव यांना सायन रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.