NMMT Bus Hits Several Vehicles In Uran: उरणमधील खोपटा कोप्रोली रस्त्यावर (Khopta Koproli Road) गुरुवारी भरधाव वेगात असलेल्या एनएमएमटी बस (NMMT Bus)ने अनेक वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) एका 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, हा भीषण अपघात सकाळी 10 च्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, NMMT बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, ज्यामुळे बस रस्त्याच्या बाजूच्या अनेक वाहनांना धडकली.
X वर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये या अपघाताचा थरार दिसत आहे. बसने एका दुकानाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोसह अनेक पार्क केलेल्या वाहनांना धडक दिल्याचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. (हेही वाचा - Sambhaji Nagar Accident: परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; तीन भावंडांचा मृत्यू)
अपघाताचा व्हिडिओ पहा -
NAVI MUMBAI | A tragic accident occurred on Khopta Koproli road in Uran on Thursday when an electric bus operated by the Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) lost control and hit six to seven vehicles. A video of Navi Mumbai Bus Accident has surfaced on social media. pic.twitter.com/wZkm0FrOs2
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) February 8, 2024
हा अपघात एका इलेक्ट्रिक हार्डवेअरच्या दुकानाजवळ घडला, जिथे अनेक वाहने उभी होती. या अपघातात नीलेश शशिकांत म्हात्रे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. (वाचा - (हेही वाचा - Rail Accident Viral Video: ट्रेन खाली आला प्रवासी प्लॅटफॉर्मवरील गर्दीने ट्रेनला धक्का मारत केली मदत; वाशी स्थानकातील घटना ( Watch Video))
अहवालानुसार, जेएनपीए बंदराच्या पूर्वेकडील भागात सीएफएस कंटेनर यार्डच्या स्थापनेमुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. गोडाऊनमध्ये अवजड वाहनांसाठी पार्किंगची सुविधा नसल्यामुळे ही वाहने रस्त्यावर उभी केली जातात, परिणामी वाहतूक कोंडी होते. अपघातानंतर स्थानिकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे सुमारे चार तास वाहतूक कोंडी झाली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.