10th & 12th Std Important News: कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनेच शिक्षण दिले जात होते. तसेच परीक्षा सुद्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. परंतु आता शाळा- महाविद्यालये सुरु करण्यात आले असून विद्यार्थ्यांना तेथे जाण्यास मिळत आहे. परंतु कोरोनाच्या काळात अभ्याक्रम पूर्ण शिकवता न आल्याने त्यात 25 टक्के कपात करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता. अशातच आता 10वी आणि 12 वी च्या लेखी परीक्षेसाठी बसणाऱ्या रिपीटर आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण त्यांना 100 टक्के अभ्याक्रमावर लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.(बीड जिल्हा परिषदेच्या शाळेत एचआयव्हीग्रस्त बालकांना शिक्षकांनी शाळेतून हाकलले)
10 वी आणि 12 वी च्या लेखी परीक्षेसाठी निवडक विषय घेऊन बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 टक्के अभ्याक्रमात कपात करुन ती देता येणार आहे. परंतु रिपीटर आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांना संपूर्ण 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची अभ्यासक्रमात सूट दिली जाणार नसल्याचे ही शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.(शाळेच्या फी मध्ये पालकांना अद्याप सवलत नाही; शालेय शिक्षण विभागाची माहिती)
दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने शिक्षण काही ठिकाणी अद्याप सुरु असल्याने काही गोष्टींच्या समस्या विद्यार्थ्यांना उद्भवत आहे. तर अभ्यासक्रम उशिराने सुरु झाल्याने तो अद्याप पूर्ण झालेला नाही. तरीही शिक्षण मंडळाकडून 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षांची घोषणा केली आहे. यामुळे पूर्ण अभ्याक्रम असल्यास त्या घेऊ नयेत अशी मागणी पालकांकडून विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.